मतदान केल्यानंतर आमदार थेट रुग्णलयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shannkarrao Gadakh

मतदान केल्यानंतर आमदार थेट रुग्णलयात

विधानपरिषदेच्या सहा रिक्त जागांसाठी सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सर्व आमदार मतदानासाठी विधानभवानत दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shannkarrao Gadakh )यांना मतदानानंतर थेट रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: Vidhan Parishad Election Live: नाराजी दूर? वळसे पाटील आणि दिलीप मोहिते यांची विधनाभवनातच चर्चा

विधानपरिषदेच्या मतदानाची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू आहे. शिवसेनेचे सर्व आमदार ताज हॉटेलमध्ये होते. मंत्री गडाख हे मतदानासाठी येत असताना त्यांचे वाहन स्लीप झाले. त्यामुळे त्याच्या मणक्याचा त्रास होत आहे. त्यांना स्लीप डिस्कची समस्या निर्माण झाली आहे. त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मात्र त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी इतर आमदारांचा आधार घेत विधानभवनातील मतदान केंद्रावर पोहचले. आणि आपला मतदानाचा हक्क बजवला. आणि त्यानंतर ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

हेही वाचा: MLC Election 2022 | भाजपची नवी खेळी, बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला

विधानपरिषदेची निवडणुक एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होत आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे.

Web Title: Minister Gadakh Suffers From Spinal Cord Injury Reliance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top