उद्यापासून मंत्री, आमदार मला शेतात हवेत; उद्धव ठाकरेंची तंबी!

मिलिंद तांबे
बुधवार, 26 जून 2019

निवडणुका येणार म्हणून आम्ही शेतकऱ्यांचा विषय घ्यायचा नाही का..?..आम्हाला शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि विश्वास कमवायचा आहे....जनतेचा विश्वास मिळवणे हेच शिवसेनेचे वैशिष्ट्य असून निवडणुका होतील तेव्हा होतील पण मला प्रत्येक मंत्री,आमदार,संपर्क प्रमुख,जिल्हा प्रमुख हा शेतकाऱ्यांसोबत शेतात दिसायला हवाय अशी तंबी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुंबई - निवडणुका येणार म्हणून आम्ही शेतकऱ्यांचा विषय घ्यायचा नाही का..?..आम्हाला शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि विश्वास कमवायचा आहे....जनतेचा विश्वास मिळवणे हेच शिवसेनेचे वैशिष्ट्य असून निवडणुका होतील तेव्हा होतील पण मला प्रत्येक मंत्री,आमदार,संपर्क प्रमुख,जिल्हा प्रमुख हा शेतकाऱ्यांसोबत शेतात दिसायला हवाय अशी तंबी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी शिवसेनेने मदत मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शिवसेनेचे मंत्री, आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुखांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करतांना उद्धव ठाकरे यांनी मंत्री,आमदार आणि पदाधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.

नुसत्या घोषणा म्हणजे वाचनपूर्ती नाही.घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे बघणं आपलं काम आहे.शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन नुसते चहा पिवू नका तर जनतेला अन्यायमुक्त करा,हीच शिवसेनेची ओळख आहे.कोण आला रे कोण आला,शिवसेनेचा वाघ आला ही आपली घोषणा आहे मात्र शिवसेनेचा वाघ काय असतो हे आपल्या कामातून दाखवून द्या असंही उद्धव यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि विजमाफी देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला.मात्र आज ही कुपोषण आणि आत्महत्येसारखे गंभीर प्रश्न सुटलेले नाहीत.आपण हे प्रश्न सोडवले नाहीत तर लोकं आपल्याला मतं का देतील असा प्रश्न ही उद्धव यांनी उपस्थित करत,जनतेच्या ताकदीला आव्हान देऊ नका.जनतेची सहनशीलता संपली की राजे - महाराजांना ही सत्ता सोडावी लागल्याचं उद्धव यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेला घरचा आहेर
पीक विमा कंपन्यांवर ना जिल्हाधिकाऱ्यांच नियंत्रण आहे ना कृषिमंत्र्यांचं,यामुळे पीक विमा कंपन्यांचं फावलं आहे,शेतकऱ्यांना विमा कंपन्या तुटपुंजी रक्कम देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम करत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेला घराचा आहेर दिला.पीक विमा कंपन्या जर दाद देत नसतील तर विमा कंपन्यांविरोधात कोर्टात दाद मागू आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ अस सांगत उद्या पासून आम्ही शेतकऱ्यांनाचे फॉर्म भरू मात्र शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर शेतकरी अंगावर येऊ नये एवढी काळजी घ्यावी अशी विनंती ही पाटील यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister MLA Farm Uddhav Thackeray