महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी गडकरींकडून मोठ्या घोषणा; 2780 कोटींचा निधी मंजूर

nitin gadkari.
nitin gadkari.

नवी दिल्ली- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. गडकरींनी महाराष्ट्रातील रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरणासाठी तब्बल २७८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागणार आहेत. गडकरी यांनी गुरुवारी अनेक ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी केलेल्या या घोषणांमुळे महाराष्ट्रातील विकासकामांना गती मिळणार आहे. गडकरींनी प्रगतीका हायवे #PragatiKaHighway या हॅशटॅगखाली राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग कामांसदर्भात घोषणा केल्या आहेत. गडकरींनी पुढील कामांना मंजुरी दिली आहे.

-राष्ट्रीय महामार्ग ७५३ जेवरील जळगाव-भद्रा-चाळीसगाव-नांदगाव-मनमाड रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी २५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा रस्ता दोन किंवा चार पदरी करण्यात येणार आहे. 
-राष्ट्रीय महामार्ग १६६ ईवरील गुहार-चिपळून रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी १७१ कोटींच्या निधीला मंजुरी मिळालीये. 
-राष्ट्रीय महामार्ग 353C २६२ वरुन ३२१ किलोमीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. शिवाय गडचिरोली जिल्ह्यातील १६ छोट्या आणि मोठ्या  पुलांच्या दुरुस्तीसाठी २८२ कोटींचा निधी मंजूर झालाय. 
-राष्ट्रीय महामार्ग ७५२ I वरील वतूर ते चारखाना रस्त्याच्या पुन:बांधणी आणि विस्तारीकरणासाठी २२८ कोटींचा निधी मंजूर झालाय.  
-राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरील तिरोरा-गोंदिया रत्याच्या विस्तारीकरणासाठी २८१ कोटी मंजूर झालेत. 
-राष्ट्रीय महामार्ग १६६ जीवरील तरेरे-गगनबावडा-कोल्हापूर रत्स्त्याच्या विस्तारीकरणासाठी १६७ कोटींचा निधी मंजूर झालाय.
-राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरील तिरोरा-गोंदिया राज्य महामार्गाच्या २८.२ किलोमीटरच्या रुंदीकरण आणि विस्तारीकरणासाठी २८८.१३ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. 
-नागपूर आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस पर्यंत फ्लायओव्हरची बांधणी आणि राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील वाडी/ एमआयडीसी जंक्सनवरील चार पदरी फ्लायओव्हरसाठी ४७८.८३ कोटींची मंजुरी मिळालीये. 
-नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६३ वरील येसगी गावातील मांजरा नदीलगत पुल बांधणीसाठी १८८.६९ कोटी मंजूर झालेत. 
-राष्ट्रीय महामार्ग ५४३ वरील आंबेगाव-गोंदिया रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी २३९.२४ कोटी रुपयांना मंजुरी मिळालीये. 
- राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफवरील परळी ते गंगाखेड रत्त्याच्या पुन:बांधणी आणि विस्तारीकरणासाठी २२४.४४ कोटी रुपयांना मंजुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com