आलमट्टी धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याचा कोल्हापूर, सांगलीतील नदी काठावर काय परिणाम होतो का, याचा अभ्यास करण्याचे काम रुरकी येथील राष्ट्रीय जलविज्ञान संस्था करत आहे.
मुंबई : कर्नाटकने आलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदी काठावरील जिल्ह्यांना किती फटका बसेल, याचा अभ्यास करण्याची जबाबदारी राज्य सरकारने रुरकी येथील राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेवर (National Institute of Hydrology) दिली आहे. या संस्थेचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार आलमट्टी धरणाच्या उंचीबाबत आपली भूमिका जाहीर करेल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी दिली.