सध्याचे मुख्यमंत्री जमिनीवर चालणारे, त्यांना हवाई सफर आवडत नाही; शंभूराज देसाईंचा उध्दव ठाकरेंना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Shambhuraj Desai Uddhav Thackeray

'मी डोंगरी भागातील आहे, तसेच मुख्यमंत्रीही डोंगरी भागातील आहेत.'

सध्याचे मुख्यमंत्री जमिनीवर चालणारे, त्यांना हवाई सफर आवडत नाही : शंभूराज देसाई

कऱ्हाड (सातारा) : मी जसा डोंगरी भागातील आहे, तसेच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे ही डोंगरी भागातील आहेत. त्यांचं गाव कोयना धरणाच्या (Koyna Dam) बॅक वॉटरच्या परिसरात आहे. त्यामुळं त्यांना सामान्य लोकांची जाण आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जास्त हवाई सफर आवडत नाही, असं सांगून मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली.

मंत्री देसाई हे कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकाराशी बोलत होते. ते म्हणाले, 'सातारा जिल्ह्याचा मास्टर प्लॅन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प, डोंगरी तालुके, पर्यटन, औद्योगिक प्रगतीसह अन्य विकासाबाबतचा आराखडा तयार करण्याचं काम सुरुय. महिन्याच्या आत तो आराखडा करुन मुख्यमंत्र्यांकडं सादर करण्यात येईल.'

हेही वाचा: शिवसेनेत मोठे फेरबदल; ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणाऱ्या सावंत, भास्कर जाधवांना मिळालं 'प्रमोशन'

मी डोंगरी भागातील आहे, तसेच मुख्यमंत्रीही डोंगरी भागातील आहेत. त्यांचं गाव कोयना धरणाच्या बॅक वॉटरच्या परिसरात आहे. त्यामुळं त्यांना सामान्य लोकांची जाण आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जास्त हवाई सफर आवडत नाही. आत्तापर्यंत जेवढा निधी मिळालेला नव्हता, तेवढा निधी सातारा जिल्ह्याला मिळेल, असा विश्वास मंत्री देसाईंनी व्यक्त केला.

हेही वाचा: माझ्या आधी खैरेंचा कसा सत्कार करता? भरकार्यक्रमातून शिरसाट चिडून निघाले

कोयना पर्यटनाचा प्रश्न लवकरच मार्गी

कोयना पर्यटनाचा विषय लवकरच मार्गी लागेल. त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जलसपंदा विभागाचे अधिकारी यांनी बोटिंगसाठीचे ठिकाण निश्चित केले आहे. बोटिंग सुरु झाल्यावर पर्यटकांचा ओघ वाढेल. नेहरु गार्डनच्या विकासासाठीचा आणि निसर्ग परिचय केंद्राचा निधी मंजूर केला आहे. येत्या आठ दिवसांत त्याचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी तो प्रस्ताव मंत्रालयात सादर केला जोईल. येत्या वर्षभरात कोयनेचा कायापालट होईल, असं देसाईंनी नमूद केलं.

हेही वाचा: गुलाम नबी आताच 'आझाद' झालेत, पण अमेठी..; इराणींनी काँग्रेससह राहुल गांधींची उडवली खिल्ली

Web Title: Minister Shambhuraj Desai Criticizes Cm Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..