

Mahad Municipal Clash Case Minister Son Vikas Gogawale Reacts
Esakal
महाड नगरपालिका निवडणुकीत मतदानावेळी मतदान केंद्रावर राडा केल्यानं मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी कोर्टाने फटकारल्यानंतर विकास गोगावलेंसह १३ जण पोलिसाना शरण गेले होते. त्यांची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आता दोन दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर तुरुंगातून सुटका झालीय. यानंतर विकास गोगावले राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहताना दिसतायत.