Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करणाऱ्याचे हातपाय तोडू; बच्चू कडूंचा इशारा | MLA Bacchu Kadu farmers protest Nagpur prahar Sanghatana maharashtra politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu kadu
Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करणाऱ्याचे हातपाय तोडू; बच्चू कडूंचा इशारा

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करणाऱ्याचे हातपाय तोडू; बच्चू कडूंचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाल करणाऱ्याचे हातपाय तोडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. ते सध्या नागपुरात आंदोलन करत आहेत.

बच्चू कडू सध्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इथं पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि शेतकरीही आहेत. जिल्हा बँकेची लिलाव प्रक्रिया उधळून लावू, असा इशारा त्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्याप्रमाणे आज ते बँकेत दाखल झाले आहेत.

यावेळी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "शेतकऱ्यावर ही वेळ यायला नाही पाहिजे. सरकारने लुटलं जास्त दिलं कमी. शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्येच्या दारात नेण्याचा हा प्रयत्न आहे. मी कलेक्टरशी फोनवर बोललो, आत्ताही चर्चा झाली. १५ दिवसांत पुन्हा आम्ही चर्चा करू. लिलाव कऱण्याची पद्धत आम्ही हाणून पाडू. जो लिलाव घेईल, त्याचे हातपाय तोडू."

जिल्हा बँकेच्या प्रशासकांना इशारा देताना बच्चू कडू म्हणाले, "शेतकऱ्याची जमीन जर कोणी लिलावात घेतली तर हात पाय पाडू. जे काही असेल तर सरकारशी बोलू. खासगी सावकारीची पद्धत जिल्हा मध्यवर्ती बँकेत चालत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही."