Vidhan Sabha 2019 : काट्याने काटा काढायचा असतो- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 September 2019

काट्याने काटा काढायचा असतो, भालके दुसऱ्या पक्षात जाणार ही चर्चा माध्यमांनी सुरू केली. ते कधीच म्हणाले नाहीत की मी दुसऱ्या पक्षात जाणार आहे. यावर काँग्रेस पक्षाशी चर्चा झाली असून आम्ही भारत भालकेंना पुन्हा आमदार करून दाखवू असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

मुंबई : काट्याने काटा काढायचा असतो, भालके दुसऱ्या पक्षात जाणार ही चर्चा माध्यमांनी सुरू केली. ते कधीच म्हणाले नाहीत की मी दुसऱ्या पक्षात जाणार आहे. यावर काँग्रेस पक्षाशी चर्चा झाली असून आम्ही भारत भालकेंना पुन्हा आमदार करून दाखवू असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, शरद पवार साहेब आणि जयंत पाटील यांची भारत भालके यांच्या प्रवेशावर चर्चा झाली आहे. तसेच, राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत गेले पण दौलत राव हे आपल्या पक्षात आहेत, त्यांनी तीन वेळा मतदारसंघाचे प्रातिनिधत्व केले असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bharat bhalke enters in NCP presence of Ajit Pawar