काँग्रेसचा आणखी एक आमदार सोडणार 'हात'; मुख्यमंत्र्यांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

- काँग्रेसच्या आमदारासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली चर्चा.

पंढरपूर : काँग्रेसचे आमदार भारत भालके भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असतानाच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भालकेंच्या घरी भेट देत त्यांचा पाहुणचार घेतला. या वेळी आमदार भालके आणि मुख्यमंत्र्यांची बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती आहे. 

आमदार भालकेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय भूमिका घेतात, यावरही भालकेंचे पुढील राजकीय गणित अवलंबून राहणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 2009 मध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव करून ते 'जायंटकिलर' ठरले होते. त्यानंतर 2014 मध्ये काँग्रेसची उमेदवारी घेत सध्याचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचा पराभव केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bharat Bhalke may leave from Congress Party