Dhananjay Munde: शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम... शिर्डीत धनंजय मुंडे फार्मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde

Dhananjay Munde: शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम... शिर्डीत धनंजय मुंडे फार्मात

Shirdi: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात धनंजय मुंडे भलतेच फार्मात दिसले. डायलॉगबाजी करुन त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. येत्या विधानसभा निडणुकीत शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून आणून आपलाच मुख्यमंत्री करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.

''शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम

आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे''

हा राहत इंदौरी यांचा शेर धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटला. भाषणामध्ये ते सांगत होते की, मला इतर राज्यातील लोक विचारतात शरद पवार एवढे बलाढ्य नेते आहेत; ज्यांच्यामुळे दिल्लीसुध्दा हादरेत. मग महाराष्ट्र एकसंघपणे पवारांच्या मागे का उभा राहात नाही. स्टॅलिन यांच्यामागे तामिळनाडू उभा राहातो, उडिसात पटनायक राज्याचे नेते होतात, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना ताकद मिळते. मग पवारांच्या मागे महाराष्ट्र का उभा राहात नाही? असं विचारलं जातं. त्यामुळे २०२४च्या विधानसभा निवडणुकीत शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा संकल्प करुया, असं आवाहन शिर्डीच्या पक्ष मेळाव्यात मुंडेंनी केलं.

महाराष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं-मुंडे

पुढे बोलतांना आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. पण दाखवलं असं की महाराष्ट्रावर कुठलंतरी मोठं संकट आहे. परंतु त्यांना खोके घ्यायचे होते. म्हणून हे नवं सरकार आलं. शरद पवार यांच्यामागे तिसरी शक्ती काम करते, असंही ते म्हणाले.

दरम्यान, दुपारी साडेबारा वाजता शरद पवार हॉस्पिटलमधून हेलिकॉप्टरने शिर्डीकडे रवाना झाले.