esakal | शरद पवार हे केवळ फार्स म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जात
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Gopichand Padalkar criticized Sharad Pawar In Pandharpur

राज्यावर कोरोनाचे संकट मोठे आहे. या परिस्थितीत यंदाचा आषाढी पालखी सोहळा रद्द केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला येऊ नये. एकाद्या सर्व सामान्य वारकरी शेतकऱ्याच्या हस्ते महापूजा करावी, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज येथे केली.  पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

शरद पवार हे केवळ फार्स म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : राज्यावर कोरोनाचे संकट मोठे आहे. या परिस्थितीत यंदाचा आषाढी पालखी सोहळा रद्द केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला येऊ नये. एकाद्या सर्व सामान्य वारकरी शेतकऱ्याच्या हस्ते महापूजा करावी, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज येथे केली.  पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
शरद पवार हे केवळ फार्स म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. अद्यापपर्यंत राज्यात शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. याविषयी आपण सभागृहात आवाज उठवणार आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आज पर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. 
आमदार पडळकर म्हणाले, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मागील सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र या सरकारने अर्थसंकल्पात कसलीही तरतूद केली नाही. त्यामुळे धनगर समाज केवळ राजकारणासाठी पवाराना लागतो. तसेच विधानसभा निवडणुकीनंतरचा नाशिक येथील अवकाळी पाऊस असो किंवा कोकणात वादळी वाऱ्याने झालेले नुकसान असो. या दोन्ही प्रसंगात शरद पवार पाहणी दौऱ्याला गेले. पण त्या ठिकाणच्या लोकांना दमडीचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे पवारांचे नेतृत्व केवळ राजकारण करण्यापुरते मर्यादित आहे. 
कोरोनामुळे यंदा आषाढी यात्रेला वारकरी व भाविक पंढरपुरात येणार नाहीत. अशावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणाची भूमिका दाखवून पंढरपुरात महापूजेसाठी येऊ नये. यावर्षी एका सामान्य वारकरी शेतकर्याच्या हस्ते महापूजेचा करावी. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतूनच विठोबाची पूजा करावी. जेणेकरून कोरोनामुक्तीच्या लढा महाराष्ट्राला देखील एक चांगला संदेश दिला जाईल, असे आमदार पडकळकर म्हणाले.