
आजारपणातही मुक्ता टिळक यांनी फडणवीसांच्या घरी जावून केलं अभिनंदन
मुंबई - मागील अनेक दिवसांपासून भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक आजारी आहेत. त्यामुळे त्या राजकारणातही फारशा सक्रीय नाहीत. मात्र जेव्हा पक्षाला गरज असेल तेव्हा त्या हजर झाल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून त्याचं कौतुकही करण्यात आलं होतं. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर आमदार टिळक यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जावून त्यांचं अभिनंदन केलं. (MLA Mukta Tilak congratulate devendra fadanvis )
हेही वाचा: धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची Friendship कधी पासून सुरु झाली ?
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत मिळून भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीसांकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतर फडणवीसांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार मुक्ता टिळक यांनी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जावून त्यांचं अभिनंदन केलं.
खुद्द फडणवीस यांनीच मुक्ता टिळक यांनी घरी भेट दिल्याची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. फडणवीस आपल्या पोस्ट म्हणतात की, या आपुलकी, जिव्हाळ्याबद्दल मनःपूर्वक आभार ! प्रकृती ठीक नसतानाही पक्षासाठी सर्वोच्च भावना राखत राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाला येऊन आपल्या ध्येयसमर्पित जीवनाचे दर्शन तर घडविले होतेच. पण, आवर्जून घरी येत माझे अभिनंदन केलेत. आभार मानू तरी कसे मुक्ताताई टिळक, असंही फडणवीस यांनी म्हटलं. मुक्ता टिळक यांनी आजारपणात देखील राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुंबई गाठली होती.
Web Title: Mla Mukta Tilak Congratulate Devendra Fadnavis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..