गुवाहाटीत बंडखोर आमदारांचं 'बर्थ डे सेलिब्रेशन'; VIDEO आला समोर

MLA Narendra Bhondekar  birthday celebrated in Guwahati with rebel Eknath Shinde and other MLA
MLA Narendra Bhondekar birthday celebrated in Guwahati with rebel Eknath Shinde and other MLA

गुवाहाटी : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे, शिवसेनेकडून १६ आमदारांच्या निलंबनासाठी प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान बंडखोर आमदार हे गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलात थांबले आहेत, या राजकीय गोंधळात बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भंडार्‍याचे आमदार नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या उपस्थितित हा वाढदिवस साजरा करण्यात आला, या व्हिडिओमध्ये सर्व आमदार दिसत आहेत. नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष आमदार आहेत. मात्र ते शिवसेना (Shivsena) समर्थित आमदार म्हणूनच ओळखले जातात. बंडखोरीनंतर आमदार भोंडेकर शिंदे गटात गेले आहेत.

MLA Narendra Bhondekar  birthday celebrated in Guwahati with rebel Eknath Shinde and other MLA
येत्या २ ते ३ दिवसात भाजपचं सरकार येणार? रावसाहेब दानवेंचं सूचक विधान

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमरांविरोधात निदर्शने केली जात आहेत. या विरोधामळे केंद्राने आमदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्रापाठोपाठ आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईचे डीजीपी आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहलं आहे. शिंदे गटातील आमदारांना आजच सुरक्षा द्या, अशा आशयाचे हे पत्र पाठवलं आहे.

बंडखोर आमदारांविरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे केंद्राने त्यांना संरक्षण पुरवले होते. आता राज्यपालांनीही एक पत्र मुंबई पोलिसांना लिहले आहे.

MLA Narendra Bhondekar  birthday celebrated in Guwahati with rebel Eknath Shinde and other MLA
डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ॲक्टिव्ह, शिंदेंसाठी थेट गृह खात्याला पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com