esakal | 'माझी छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील'
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Narhari Zirwal Supports Sharad Pawar

राष्ट्रावदीचे शेवटचे आमदार नरहरी झीरवळ यांना आज सकाळी दिल्लीत शोधण्यात यश आले. त्यानंतर त्यांनी बोलताना माझी छाती फाडली तरी त्यामध्ये आमचे नेते शरद पवारच दिसतील.

'माझी छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आपल्या बेपत्ता आमदारांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मंडळी सक्रीय होती. यातील नाशिकच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत गेलेल्या आमदारांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. यातील शेवटचे आमदार नरहरी झीरवळ यांना आज सकाळी दिल्लीत शोधण्यात यश आले. त्यानंतर त्यांनी बोलताना माझी छाती फाडली तरी त्यामध्ये आमचे नेते शरद पवारच दिसतील.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आमदार नरहरी झीरवाळ यांना नाशिकचे कैलास मुदलीयार यांनी नवी दिल्लीत शोधुन काढले. त्यानंतर दुपारी बाराला ते झीरवळ यांना घेऊन शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील '6 जनपथ' या निवासस्थानी पोहोचले. जे तीन आमदार दिल्लीला गेले होते त्यांच्या शोधासाठी खास मोहिम सुरु केली होती. याबाबत माहिती मिळाल्यावर काल रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी काही निवडक कार्यकर्त्यांना दिल्लीला पाठवले होते. बेपत्ता आमदारांतील दौलत दरोडा व नितीन पवार रात्री मुंबईला परतले. यातील शेवटचे बेपत्ता आमदार झीरवाळ यांना आज सकाळी दिल्लीतच शोधण्यात यश मिळाले. 

अजित पवारांनी पदभार स्वीकारलाच नाही; भाजपच्या गोटात खळबळ

आमदार झीरवळ यांनीही आपण पक्षाबरोबरच आहोत, आपल्याला फसविण्यात आले होते, असे सांगीतल्याचे कळते. सध्या ते शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले असून आज सायंकाळी ते मुंबईला परततील, असे सांगण्यात आले आहे.