
उद्धव ठाकरे हे मुंबईतील दाऊद इब्राहिम, गॅंगवॉरला सुरुवात - नितेश राणे
मुंबई : काल मुंबईत राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालीसा प्रकरणावरुन झालेल्या वादावर आणि रात्री सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर आणि सरकारवर निशाणा साधला आहे.
काल झालेल्या वादावर ते माध्यमांना बोलताना म्हणाले की, पोलिस फक्त पेरोलसाठी आहेत का? काल ऐवढे लोकं जमले होते मग गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिस बाजूला काढून आंदोलन करुन दाखव असा इशाराही त्यांनी वरुण सरदेसाई यांना दिला.
हेही वाचा: प्रियांका गांधींनी 2 कोटीचं चित्र विकत घ्यायला भाग पाडलं; कपूर यांचा खुलासा
राणेंचं घर पाडणं, सोमय्यावर हल्ला करणं, दरेकर यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवणं हेच कामं सध्या हे सरकार करत असल्याचा आरोप राणेंनी केला. केंद्रीय सुरक्षा असताना नेत्यांना मारण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप करत उद्धव ठाकरे हे मुंबईतील दाऊद इब्राहिम आहेत, मुंबईत आता गॅंगवॉरला सुरुवात झाली आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायमचे मुख्यमंत्री राहणार नाहीत, गृहमंत्री वळसे पाटलांनी काही दिवस लंडनला फिरायला जावे, परत आल्यावर तुम्हाला असे गुन्हे होताना दिसणार नाहीत, सगळी मुंबई मी साफ करतो असं ते माध्यमांना बोलताना म्हणाले आहेत.
नामर्दासारखं ठाकरे सरकार हे सोमय्यांवर हल्ला करत आहे. त्यांचं सरकार अशा पद्धतीने चालत असेल तर त्याला उत्तर कसं द्यायचं ते आम्हाला माहिती आहे. "अगर आप पत्थर की लढाई करेंगे तो हम पत्थर का जवाब पत्थर से देंगे" असा इशारा त्यांनी केला आहे.
तुम्ही पोलिस विभागाल 24 तासासाठी सुट्टीवर पाठवा मग आम्ही दाखवतो यांना शांत कसं बसवायचं, सगळ्या मुंबईत आम्ही स्वच्छता मोहिम राबवतो असं ते बोलताना म्हणाले.
राज्यातील जनतेला सुरक्षा पोहचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं असतं पण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी विरोधी पक्षाच्या नेत्यावर हल्ले केले आहेत तर सामान्य जनता कशी जगेल असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Web Title: Mla Nitesh Rane On Cm Thackeray Somaiya Attack
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..