वीज सवलत देण्यास भाग पाडणार; प्रकाश आवाडेंचा राज्य सरकारला इशारा l Prakash Awade | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prakash aawade

उद्योगधंद्याबाबत सरकारला देणेघेणेच नाही; शासनावर आवाडे नाराज

इचलकरंजी : केंद्र शासन अत्याधुनिक यंत्रमाग उद्योगासाठी ‘टफ’ योजने अंतर्गत २५ टक्के अनुदान देण्याचे नियोजन करीत आहे. दुसरीकडे या उद्योगासाठी राज्य शासन वीजदरातील सवलत बंद करण्याचे धोरण राबवीत आहे. या सरकारला उद्योगधंद्यांबाबत देणेघेणेच नाही, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. ऑनलाईन नोंदणी न केलेल्या २७ अश्‍वशक्तीवरील यंत्रमागधारकांची वीज सवलत बंद केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आवाडे यांनी भूमिका मांडली. मुंबईतील (Mumbai)बैठकीस स्वतःहून जाणार असून कोणत्याही स्थितीती राज्य शासनाला पूर्वीप्रमाणे वीजदर सवलत देण्यास भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

आवाडे म्हणाले, ‘‘वीज दरातील सवलत बंद करणे, हे यंत्रमाग उद्योगाला न परवडणारे आहे. शहर व परिसरात २७ अश्‍वशक्तीवरील सुमारे २५०० यंत्रमाग घटक आहे. विधान सभेत दोन वर्षांपूर्वी ७५ पैशाची अतिरिक्त सवलत देण्याबाबत जाहीर केले होते. ही सवलत आजतागायत मिळालेली नाही. याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांची भेट घेतली. त्यांनी याबाबत सहकार्याची भूमिका घेतली. त्यानंतर पाठपुराव्यानंतर प्रस्ताव मंत्रिमंडळ मंजुरीच्या पातळीवर आला आहे. यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते; पण त्याला अडीच महिने झाले. व्याज अनुदानाचा परतावा २०१७ पासून मिळालेला नाही.’’

हेही वाचा: उद्धवजी आणि माझ्यात काहीच वाकडं नाही; चंद्रकांतदादांचा पलटवार

ते म्हणाले, ‘‘राज्य शासनाप्रमाणे केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करीत आहे. केंद्र शासनाकडून सर्वच घटकांना मदतीची भूमिका घेतली जात आहे. यंत्रमाग उद्योगासाठी ‘टफ’ योजने अंतर्गत ३० टक्के अनुदान दिले जात होते. त्यामध्ये कपात करून ते १० टक्के केले होते; पण आता नवीन आर्थिक वर्षापासून २५ टक्के अनुदान देण्याचे नियोजन आहे. केंद्र शासन उद्योगाला देण्याची भूमिका घेत असतांना राज्य शासन मात्र सवलती बंद करण्याचे धोरण राबवित आहे. शासनाच्या या चुकीच्या भूमिकेबाबत विचार करण्याची वेळ आली आहे.’’

शहरातील सर्वच घटकांनी मोठ्या अपेक्षेने मला निवडून दिले; पण पक्षीय राजकारणातून यंत्रमाग उद्योगातील प्रश्नांबाबत मंत्रालय पातळीवर होणाऱ्या बैठकींना बोलवले जात नाही. यात दबाबतंत्राचाही वापर केला जात आहे. श्रेयवाद कोणीही घ्या; पण काम होऊ द्या, अशी आपली भूमिका राहिली आहे. आता श्रेय घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचच चढाओढ सुरू आहे,

- प्रकाश आवाडे, आमदार

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top