MLA Shahaji Patil | बाळासाहेबांची अंत्ययात्रा अन् शिवसेनेत प्रवेश; शहाजी पाटलांनी सांगितला भावनिक किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla shahaji patil on joining shivsena uddhav thackeray and contesting election in sangola

बाळासाहेबांची अंत्ययात्रा अन् शिवसेनेत प्रवेश; शहाजी पाटलांनी सांगितला भावनिक किस्सा

मुंबई : राज्यात सुरू झालेली राजकीय उलथा पालथ आता थांबली असून महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झालं, या सगळ्यात काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेमंधी हाय, या डायलॉगने शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील राज्यात प्रसिध्द झाले. त्यांचा हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला. काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांचा चेला असणार्‍या शहाजी पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागील कारण सांगितले आहे.

शिवसेनेत प्रवेश केला, निवडणूक जिंकली त्यानंतर बंडात सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते, यावर बोलताना पाटील म्हणाले की, सांगोला तालुका शिवसेनेचा संबंध नसल्यासारखा आहे. २००९ साली शिवसेनेला येथे सोळाशे मतं होती आणि २०१३ साली मी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा माझा पक्ष चुकला असं मला म्हटलं गेलं, पण तेव्हा देखील मी पक्ष चुकला नाही हे सिद्ध करून दाखवेल असं सांगीतलं होतं असं सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी ते एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

पुढे शिवसेनेत प्रवेशाबद्दल बोलताना शहाजीबापू म्हणाले की, या पक्षात मी स्वार्थाने, आमदार होण्यासाठी आलो नाही, मी घरी होतो आणि हिंदुऱ्हदयसम्रांट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. टिव्हीवर बघत होतो, अंत्ययात्रा निघाली त्यामध्ये तुफान गर्दी होती. टिव्हीवर असं सांगत होते की अशी प्रेत यात्रा पूर्वी कधी झाली नाही. बाळासाहेबांच्या प्रेताला अग्नि देताना उद्धव ठाकरे यांना बघताना मला रडू आलं. मी रडत नाही, जीवनात कधीच रडलो नाही. आई-वडील वारले, माझे चार भाऊ वारले मा‍झ्या डोळ्यात कधीच थेंब आला नाही. पण त्या दिवशी मी रडलो. बायकोला आश्चर्य वाटलं. तेव्हा पत्नीला सांगीतलं, लई मोठा माणूस होता. या माणसाने तळातील गोरगरीबांच्या पोरांना लई मोठेपण मिळवून दिलं. तेव्हा पत्नीला सांगीतलं, आता आमदार होईन ते शिवसेनेचा होईन. मी शिवसेनेत जाणार असं सांगीतलं होतं असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

त्यानंतर मी योग्य वेळी आलो, निरवणकरांना फोन लावला उद्धव ठाकरेंची भेट घेतली, माझा प्रवेश घ्या म्हणून सांगितलं. त्यांनी ठिक आहे म्हणून सांगितलं. उमेदवारी निश्चित करतो, पडला तर महामंडळ देतो. मला काही नको म्हणून सांगितलं, मला फक्त लढायचं, तेही शिवसेना म्हणून लढायचं असं सांगितलं. ७६ हजार मत पडली, आता पुन्हा १ लाख मत घेऊन विजयी झालो असे शहाजी पाटील यांनी सांगितलं.

Web Title: Mla Shahaji Patil On Joining Shivsena Uddhav Thackeray And Contesting Election In Sangola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray
go to top