Uniform Civil Code : समान नागरी कायद्यावरून शिवेंद्रसिंहराजेंचं मोठं विधान, "घेतला हा निर्णय.."

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले आहेत.'
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosaleesakal
Summary

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले आहेत.'

सातारा : आपण ज्या राजघराण्यात जन्मलो आहोत, त्या घराण्यातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते? प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचं असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी खासदार उदयनराजेंच्या वक्तव्यावर केली.

प्रतापगडावर शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमास खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) उपस्थित राहिले नव्हते. त्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून उशिरा निमंत्रण मिळाल्याचं सांगत पालकमंत्र्यांसह इतर कोणाचाही आपल्याला फोन आला नसल्याचं सांगितलं होतं. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर टीका केली.

Shivendraraje Bhosale
NCP MLA : अक्कलशून्य लोढांनी इतिहासाबद्दल आपलं अज्ञान दाखवलंच; राष्ट्रवादीच्या आमदारानं काढली अक्कल

शिवेंद्रसिंहराजे यांनी एका प्रश्नाला उत्तर देत मला जिल्हाधिकारी कार्यालयातून निमंत्रण आले होते. आपण ज्या घराण्यात जन्मलो आहे, त्या घरातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते? प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

Shivendraraje Bhosale
Sharad Pawar : शरद पवारांना 'जाणता राजा' पदवी दिली, ते कुठे लढायला गेले होते? नरेंद्र पाटलांचा खोचक सवाल

समान नागरी कायद्याबाबत (Uniform Civil Code) भूमिका मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाचे हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले. यामध्ये काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याची अनेक वर्षांचीही मागणी होती. समान नागरी कायदा हा राज्याच्या हिताचा निर्णय असेल असे मलाही वाटतंय. त्यामुळं याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.’’

Shivendraraje Bhosale
आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,‘‘मी स्वतः त्या कार्यक्रमाला होतो. त्यांनी जे विधान केलंय ते कोणाशी तुलना करून केलेलं नाही. आता अलीकडच्या काळात कुठलेही वक्तव्य केले की भावना भडकण्याचा प्रयत्न होतोय. पण, काल त्यांच्या विधानातून असं काही दिसून येत नाही.’’ राज्यपालांच्या भूमिकेबाबत तुम्ही आक्रमक दिसत नाही, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘भडक बोलणे म्हणजे आक्रमकता नव्हे.’ राज्यपाल बदलाचा निर्णय हा महाराष्ट्रातून होत नाही तर, तो केंद्राकडे आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस हे सर्वांच्या भावना योग्य पोचवण्याचे काम करतील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com