Sharad Pawar : शरद पवारांना 'जाणता राजा' पदवी दिली, ते कुठे लढायला गेले होते? नरेंद्र पाटलांचा खोचक सवाल

'शिवछत्रपती हे देशाचे आराध्य दैवत असून, कुठल्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलणं चुकीचं आहे.'
Sharad Pawar vs Narendra Patil
Sharad Pawar vs Narendra Patilesakal
Summary

'शिवछत्रपती हे देशाचे आराध्य दैवत असून, कुठल्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलणं चुकीचं आहे.'

सातारा : शरद पवार यांना (Sharad Pawar) जाणता राजा ही पदवी दिली जाते. मात्र, ते कुठे लढायला गेले होते, अशी खोचक टीका करत कार्यकर्त्यांनीही नेत्यांना पदवी देताना शब्दांचा योग्य वापर करावा, असं मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) कुणीही अवमानकारक भाष्य करणं अयोग्य आहे. शिवछत्रपती हे देशाचे आराध्य दैवत असून, कुठल्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलणं चुकीचं आहे, असं त्यांनी सांगितलं. पाटील म्हणाले, ‘‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात काही प्रमाणात समन्वय कमी असल्याने व्याज परताव्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता व्याज परताव्याची प्रकरणे निकालात काढून ती शून्य टक्‍क्यावर आणली जाणार आहेत. महामंडळाची जबाबदारी २०१८ पासून माझ्याकडे आली असून, या कालावधीत तीन हजार ५०० कोटींचे कर्जवाटप व ५० हजार लाभार्थी जोडले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीन हजार २०० लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतील बहुतांश लाभार्थी परतावा करत असल्याने विविध बँका स्वागत करत आहेत.

Sharad Pawar vs Narendra Patil
Taliban Government : पत्रकारितेच्या तत्त्वांचं उल्लंघन; तालिबाननं केलं 'व्हॉइस ऑफ अमेरिका'चं प्रसारण बंद

दरम्यान, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी योजनेतही सकारात्मक बदल घडविण्यात येणार आहेत. आर्थिक महामंडळाच्या योजनेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी विचार सुरू असून, याबाबत बैठकही झाली आहे. याचबरोबर महामंडळाच्या योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा समन्वयकांची संख्या वाढविण्यात येणार असून, येत्या काही वर्षांत एक लाख मराठा उद्योजक तयार करणार आहे.’’

Sharad Pawar vs Narendra Patil
आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

शंभूराज देसाईंना जाब विचारणार

गेल्या आठवड्यात कऱ्हाड येथे झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटन पत्रिकेत माझे नाव होते. मात्र, प्रतापगडावर झालेल्या शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रम पत्रिकेतून माझे नाव वगळण्यात आले. मी जिल्ह्याचा भूमिपुत्र व राज्यपातळीवरील एका पदावर कार्यरत असल्याने पत्रिकेत नाव टाकावे, अशी अपेक्षा होती. मात्र, या प्रकाराचा जाब पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन विचारणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Sharad Pawar vs Narendra Patil
Railway News : गांधीनगर-मुंबई 'वंदे भारत एक्स्प्रेस' पुन्हा गुरांवर आदळली; दोन महिन्यांत चौथी घटना

लाभार्थी संवाद मेळावा

आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून ज्या लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन व्यवसाय उभारले आहेत, असे लाभार्थी व बँक अधिकाऱ्यांशी तीन डिसेंबरला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत हा मेळावा होणार असून, याद्वारे योजनेचा प्रसार व जनजागृती मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com