Vinayak Mete Death: विनायक मेटे यांचे अपघाती निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Mete

Vinayak Mete Death: विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

(MLA Vinayak Mete Accident Death In Road Accident)

आज पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे. अखेर त्यांनी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

हेही वाचा: Vinayak Mete Accident: आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात; मेटे गंभीर जखमी

दरम्यान, पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने डाव्या बाजून धडक दिली. ट्रकच्या बंपरमध्ये आमची गाडी अडकली आणि आम्हाला फरपटत नेलं असं त्यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांनी सांगितलं आहे. त्यानंतर मी पोलिसांना १०० नंबरवर कॉल केला पण त्यांची मदत लवकर मिळाली नाही. तब्बल एका तासानंतर आम्हाला मदत मिळाली असा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे.

मराठा आरक्षणासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने गेली अनेक वर्षे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून योगदान दिले होते. त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली असून, "मराठा आरक्षणासाठी नेटाने झगडणारा नेता अचानक गेला" अशा शब्दांत भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

त्याचबरोबर मराठा समाजासाठी झगडणारा नेता गेला पण आता त्यांच्या मागे मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: Mla Vinayak Mete Accident Death In Shivsangraam Beed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :accidentdeathvinayak mete