Yogesh Kadam Accident : अपघातानंतर आमदार योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, मी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogesh Kadam

Yogesh Kadam Accident : अपघातानंतर आमदार योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, मी...

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात झाला. पोलादपूर तालुक्यातील चोळई गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर आमदार योगेश कदम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा अपघात झाला होता. रात्री 10.15 च्या सुमारास हा अपघात झाला होता. परंतु आई जगदंबेच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने मी आणि माझे सर्व सहकारी सुखरूप आहोत. आमची चिंता करू नका. आज एका मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो आहोत. मला कोणत्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही. त्यासोबतच माझे पुढील सर्व नियोजित कार्यक्रम नियोजित वेळेवर पार पडणार आहे असं योगेश कदम म्हणाले आहेत.

हेही वाचा: Accident News : दिल्लीतील अपघाताची पुनरावृत्ती; 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला कारने नेलं फरफटत

आमदार योगेश कदम यांच्या कारला काल रात्री कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत अपघात झाला. कारच्या पुढे आणि पाठीमागे पोलीस वाहने असतानाही टँकरने धडक दिली. शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Yogesh Kadam: शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात

सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. आमदार योगेश कदम हे खेड कडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने गाडीचे नुकसान झाले आहे आमदार योगेश कदम सुखरूप आहेत.

टॅग्स :accident