
शिंदे गटाच्या आमदारांना कायद्याचा धाक नाही? सरवणकर, बांगर यांच्यानंतर 'या' नेत्याची दादागिरी
Eknath Shinde: शिंदे गटाच्या आमदारांना कायद्याची भिती आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. मागिल काही दिवसांपासून शिंदे गटाच्या आमदारांचे कारणाने समोर येत आहेत.
मुंबईमध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मुंबईमध्ये ठाकरे आणि शिंदे गटामध्ये जोरदार गणपतीच्या मारहाण झाली होती त्यावेळी सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे दमदाटीचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत.
हेही वाचा: NCP News: राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला कोर्टाचा दिलासा; १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला स्थगिती
अशातच पुन्हा एकदा बांगर यांचा मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे.
डॉक्टर अशोक उपाध्याय असे आमदार बांगर यांनी मारहाण केलेल्या प्राचार्याचे नाव आहे. शिंदे गटाचेच आमदार रमेश बोरनारे यांची देखील दादागिरी समोर आली आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेतली.
हेही वाचा: Karnataka Border Dispute: न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांना कर्नाटक सरकारकडून दिवसाला ६० लाख रुपये
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित झाले होते. दरम्यान बोरनारे यांची गाडी पोलिसांनी आडवली यावेळी माझी गाडी का नाही जाऊ दिली? असा प्रश्न करत शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली.
यामध्ये पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरण मिटवलं. मात्र याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होते आहे. मुख्यमंत्री सतत म्हणत असतात हे सर्वसामान्याचे सरकार आहे. मात्र शिंदे गटाचे आमदार गुन्हेगारांसारखे शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करतात.