MLC Election 2022 : मुक्ता टिळक अन् लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLC election 2022 Congress objected to the vote of 
bjp Mukta Tilak and Laxman Jagtap

मुक्ता टिळक अन् लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

मुंबई : आज विधान परिषदेची निवडणूक आज होत आहे, सर्व आमदारांनी मतदान केले आहे, मात्र, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. या भाजपच्या २ आमदारांच्या मतदानावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. (MLC election 2022 Congress objected to the vote of bjp Mukta Tilak and Laxman Jagtap)

विधान परिषेद निवडणुकीचे मतदान नुकतचं पार पडलं. दरम्यान, मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर कॉंग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मुक्ता टिळक जगताप यांची मतदान पत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मतदानावेऴी दोन सहकारी उपस्थित असल्याचाही काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे ही तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा: मुस्लिम मुली 16 व्या वर्षी करू शकतात लग्न, HC चा महत्वाचा निर्णय

विधानपरिषद निवडणुकीसाठी 285 आमदारांचं मतदान पूर्ण झालं असून पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आपापल्या उमेदवारांचा कोटा पूर्ण झाला आहे. दरम्यान, कॉंग्रेसने आक्षेप घेत नव्या वादाला तोंड फोडले आहे. या निवडणूकीत गुप्त मतदान आहे. पण टिळक, जगतापांची मतपत्रिका इतर नेत्यांनी मतदान पेटीत टाकली. दोघांच्या मतदानावेळी २ सहाकारी नेते उपस्थित असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

हेही वाचा: रामराजेंना निवडणुकीत अजिबात मदत करणार नाही; आमदार गोरेंची स्पष्ट भूमिका

दोन दिवसांपूर्वी आम्ही परवानगी घेतली आहे त्यामुळे निवडणूक अधिकारी कॉंग्रेसचा हा आरोप फेटाळणार असे भाजपाने म्हटले आहे, तसेच कॉंग्रेसला याही निवडणूकीत पराभव दिसत असल्याने अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत असे मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mlc Election 2022 Congress Objected To The Vote Of Bjp Mukta Tilak And Laxman Jagtap

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top