१० रुपयाच्या थाळीसोबत बिस्लेरी पिणारा गरीब मंत्री; मनसेची टीका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 January 2020

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष यांनीदेखील यावरुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. १० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब मंत्री असा टोला त्यांनी हाणला आहे.

मुंबई :ठाकरे सरकारची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना बुधवारी मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी सुरू करण्यात आली. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान, या योजनेवर मनसेकडून सरकारवर गंभीर टीका करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या शिवथाळी उद्घाटनावरून मनसेने टीका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, मंत्री जितेंद्र आव्हाड यावरून चांगलेच ट्रोल झाले आहेत. उद्घाटन केल्यानंतर शिवथाळीचा आस्वाद घेत असताना जितेंद्र आव्हाड यांनी सोबत पाणी पिण्यासाठी बिस्लेरी बाटली घेतली होती. बिस्लेरी बाटलीची किंमत शिवथाळीपेक्षा जास्त असल्याने जितेंद्र आव्हाड यांना ट्रोल केलं जात आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष यांनीदेखील यावरुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. १० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस असा टोला त्यांनी लगावला आहे.

गोरगरिबांसाठी सवलतीच्या दरात भोजन मिळावे म्हणून शिवसेनेने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात दहा रुपयात शिवथाळी योजना जाहीर केली होती. शुक्रवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या योजनेच्या तयारीचा आढावा व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व जिल्ह्य़ांच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून घेतला.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे नाही. मुख्यत्वे गोरगरीबांसाठी ही योजना आहे. नैतिकतेच्या आधारावर तिचा लाभ घेतला जावा, असे शासनाला अभिप्रेत आहे. थाळीत पोळी, भाजी, वरण, भात आदींचा समावेश राहील. दुपारी १२ ते दोन या वेळेत सर्वसामान्यांना शिवभोजनाचा लाभ घेता येईल.

पुण्यात सुरु झाले शिवभोजन? पाहा कोठे?

अशी असेल थाळी

1) 30 ग्रामच्या 2 चपात्या

2) 100 ग्रॅम भाजीची वाटी

3) 150 ग्रॅम भात

4) 100 ग्रॅम वरण

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुम्हीही चालवू शकता शिवभोजन योजना

तुम्हाला जर राज्याच्या या उपक्रमात वाटेकरी व्हायचं असेल तर सरकारने यासाठी तरतूद केली आहे.

  •  शिव भोजनालय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची पर्याप्त जागा असणे गरजेचे आहे.
  • योजना राबविण्यासाठी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येईल.
  •  महापालिका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल.
  •  गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त असलेल्या जिल्हा रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये यासारख्या ठिकाणी थाळीची विक्री केली जाईल.
  •  योजनेवर संनियंत्रण, पर्यवेक्षण ठेवण्यासाठी राज्य स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती असेल. ही समिती सर्व पर्यायांचा विचार करून योजनेचा पुढील टप्पा ठरविण्याची कार्यवाही करेल.
  • सेंट्रल किचन, नामवंत स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक न्यास व सीएसआर आणि व्ही

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns amey khopkar criticized on ncp jitendra awhad shiv thali yojana mumbai