esakal | सेना भवनाबाहेर मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वावरून डिवचण्याचा प्रयत्न?
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Banner

सेना भवनाबाहेर मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वावरून डिवचण्याचा प्रयत्न?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मंदिरं उघडण्यावरून अनेकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) विरोधकांकडून टीका करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेच्या हिंदूत्वावर वारंवार प्रश्न उपस्थित केला गेला. आता मनसेने देखील सेनाभवनासमोर बॅनरबाजी (MNS Banner on Hindu slogan) करून ''गर्व से कहो हम हिंदू है'' असे म्हटले आहे. मनसेने शिवसेनेच्या हिंदूत्वाला डिवचण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? असे बोलले जात आहे.

हेही वाचा: आज भगवान गडावर दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण?

हिंदूत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली होती. मात्र, गेल्या २०१९ च्या भाजप निवडणुकीत शिवसेनेने भाजपपासून काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसोबत सरकार स्थापन केले. विचारधारेच्या विरोधात जाऊन शिवसेनेने सरकार बनविल्याचा आरोप देखील यावेळी झाला. तसेच भाजपकडून वारंवार शिवसेनेच्या हिंदूत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील हिंदूत्वावरून शिवसेनेवर टीका केली.

दरम्यान, कोरोनाच्या काळात सर्व काही बंद होते. मात्र, टप्प्याटप्याने सर्व सुरू करण्यात आले. तरीही मंदिरे मात्र बंद होती. यावेळी मनसेने आक्रमक भूमिका घेत मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन देखील केले होते. स्वतः राज ठाकरे यांनी अनेकवेळा राज्य सरकार आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. आता देखील शिवसेना भवनाच्या बाहेर बॅनरबाजी करून मनसेला नेमकं काय सिद्ध करायचं आहे? हा देखील मोठा प्रश्न आहे.

loading image
go to top