राज ठाकरे म्हणतात, मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 January 2020

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना 9 फेब्रुवारीला होणारा मोर्चा न भूतो न भविष्यती असा करावा अशा सूचना दिल्या आहेत.

मुंबई : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनाच हिंदुहृदयसम्राट म्हणायचे ही भावना राज ठाकरे यांच्या मनात असेल म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणून नये अशा सूचना केल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनसेचे एक दिवसीय अधिवेशन नुकतेच मुंबईत पार पडले होते. या अधिवेशनात शॅडो कॅबिनेटसह, अमित ठाकरेंची नेतेपदी निवड असे अनेक ठराव मंजूर करण्यात आले होते. यानंतर प्रथमच रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे उपस्थित होते. अवघ्या दहा मिनिटांमध्ये राज ठाकरे तेथून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून निघून गेले. या बैठकीत त्यांनी त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणू नये असे म्हटले आहे.

नांदगावकर म्हणाले, की नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना 9 फेब्रुवारीला होणारा मोर्चा न भूतो न भविष्यती असा करावा अशा सूचना दिल्या आहेत. या मोर्चासंदर्भात पोलिसांकडून आता परवानगी घेऊ पोलिस परवानगी मिळाली की आम्ही रस्ते ठरवू, कशा मार्गाने मोर्चा जाईल ते पोलिसांकडून परवानगी मिळाल्या नंतर सविस्तर बोलू. हिंदुहृदयसम्राट बोलू नका असे राज ठाकरे सहकाऱ्यांना बोलले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief Raj Thackeray guide to party workers in Mumbai