esakal | लाव रे तो व्हिडिओ! राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवल्या क्लिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

लाव रे तो व्हिडिओ! राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवल्या क्लिप्स

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाजप-मनसे यांच्यातील युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मनसे नेते राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट झाल्यानंतर युतीची चर्चा रंगली होती. पक्षातील नेत्यांनी याचं खंडण केल्यानंतर आता पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांनी भाषणाच्या क्लिप्स पाठवल्याचं सांगितलं. त्यामुळे मनसे-भाजप युतीची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. राज ठाकरेंच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर आक्षेप असल्यामुळे भाजप मनसेशी युती करु शकत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांच्या अलीकडच्या भाषणाच्या काही क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचं म्हटल जातेय.

लवकरच मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. युती झाल्यास दोन्ही पक्षांना फायदा होईल, असं म्हटलं जातेय. आगामी पालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेसोबत भाजप युती करण्यासाठी उत्सुक आहे का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याची घडामोड पाहता या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल पडले आहे.

मनसेकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, कोकण दौऱ्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी मनसे युतीची शक्यता खोडून काढली आहे.

loading image
go to top