व्यंगचित्रकार मित्राच्या निधनाने राज ठाकरे हळहळले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 December 2019

ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनिस (वय 69) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना रुणालयात तपासणीसाठी नेले असता तिथेच हृदयविकासाचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुंबई : ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने मनसे अध्यक्ष व व्यंगचित्रकार असलेले राज ठाकरे हळहळले असून, त्यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आदरांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की माझे मित्र, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस ह्यांचं निधन झालं. विकास ह्यांनी आयुष्याची ५० वर्ष व्यंगचित्रकलेला वाहिली. व्यंगचित्रकाराच्या कुंचल्याला रोज आव्हान देणारं राजकीय वातावरण असताना सबनीसांची उणीव नक्कीच भासेल. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

दोन लाखांची कर्जमाफी म्हणणाऱ्या सरकारनेही शेतकऱ्यांवर घातली 'ही' बंधने

ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनिस (वय 69) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना रुणालयात तपासणीसाठी नेले असता तिथेच हृदयविकासाचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. तब्बल 50 वर्षे त्यांनी व्यगंचित्रकलेची अखंड सेवा केली. राजकीय व्यंग हेरून कुंचल्याचे चौफेर फटकारे मारणारे ते ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार होते. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief Raj Thackeray tribute to cartoonist Vikas Sabnis