राज ठाकरेंना नोटीस दिल्याने मनसे आक्रमक; भाजप आमदारांच्या चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

कोहिनूरप्रकरणी चौकशीसाठी ठाकरे यांना 22 ऑगस्टला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घोटाळे करणाऱ्या भाजप आमदारांची चौकशी करा अशी मागणी केली आहे.

कोहिनूरप्रकरणी चौकशीसाठी ठाकरे यांना 22 ऑगस्टला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. 

मनसेने राज ठाकरेंना पाठिंबा म्हणून #isupportRajThackeray हा ट्विटरवर ट्रेंड सुरु केला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशपांडे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे नव्या भारताचे नवीन हिटलर आहेत. जर सरकार सत्याचे असेल, तर पहिले मुंबई बँकेत काहिशे कोटींचा घोटाळा करणाऱ्या भाजपच्या आमदारांची चौकशी करा. नोटीस काढायची गरजपण लागणार नाही, अर्ध्यापेक्षा भाजपचे घोटाळेबाज आमदार जेलमध्ये असतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS criticize BJP on ED notice to Raj Thackeray