esakal | "उठा उठा शाळा चालू झाली" मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ट्विट ठरणार वादाचा मुद्दा?
sakal

बोलून बातमी शोधा

mns tweet

‘उठा उठा शाळा चालू झाली, मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टिका

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : मनसेकडून (MNS) नेहमीच सरकारविरोधात टीकेची झोड उठवली जाते. त्यातच आता मनसे नेत्याचा (MNS) 'हा' ट्वीट हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. तसेच या ट्विटवर विविध प्रतिक्रिया यायलाही सुरूवात झाली आहे.

‘उठा, उठा शाळा चालू झाली, आता मंत्रायलयातसुद्धा जायची वेळ झाली’

‘उठा, उठा शाळा चालू झाली, आता मंत्रायलयातसुद्धा जायची वेळ झाली’, अशा शब्दात ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. राज्य सरकारने शाळा सुरू केल्या, मात्र मुख्यमंत्र्यांच्या अद्यापही वर्क फ्राॅम होमवरून मनसे स्टाईलने टीका करण्यात आली आहे.

गेले दीड ते २ वर्ष कोरोनाने जगभरात थैमान घातले. त्यामुळे सर्व काही ठप्प असल्याने कोरोना संकटात वर्क फ्राॅम होम ही संकल्पना मोठ्या प्रमाणात नावारूपाला आली.. तर आता कोरोना रूग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असून राज्यातील निर्बंधांच्या नियमांत शिथिलता आणण्यात येत आहे.

राज्यातील शाळादेखील आता ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील राज्याचा राज्य कारभार घरूनच चालवण्याच्या (work from home) पद्धतीचा अवलंब केला. परंतू, आता यामुळे विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठवली तसेच मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत यावरून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. पण कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सरकारच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ; डिझेल शंभरीजवळ

हेही वाचा: Gold Rate : सोन्याचे भाव किंचित वधारले; तपासा लेटेस्ट भाव

loading image
go to top