
५ जून रोजी राज ठाकरे यांनी अयोध्येत श्रीराम दर्शनासाठी जाणार असल्याची घोषणा केली होती
आम्हाला कुणीही अडवू शकत नाही, राज ठाकरेंचा कार्यकर्ता पोहचला अयोध्येत
मागील काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगा, हनुमान चालीसा या विषयांवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि वाद शिगेला पोहचला. याचदरम्यान, ५ जून रोजी राज ठाकरे यांनी अयोध्येत श्रीराम दर्शनासाठी जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. (MNS Latest News)
यावेळी उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आम्ही अयोध्येत पाऊल ठेऊन देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी दिला होता. उत्तर भारतीयांची माफी मागून त्यांनी अयोध्येत यावं, असंही ते म्हणाले होते. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अयोध्या दौरा पुढे ढकलावा लागला होता. मात्र, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे.
हेही वाचा: इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवा; पाकिस्तानात हाय अलर्ट
मनसेचे (MNS) ठाण्यातील नेते अविनाश जाधव हे काही कार्यकर्त्यांसह रविवारी अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत पोहचल्यावर त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले आहे. जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली. आम्ही ठरवल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच, काहीवेळापूर्वीच आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणतात, आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो, असे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येत येणार तेव्हा त्यांना रोखण्यासाठी बृजभूषण सिंह कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येत येणार होते. मनसेचे नेते आणि कार्यकर्ते अयोध्येत आल्यास आम्ही त्यांना शरयू नदीत बुडवू, असा इशाराही बृजभूषण सिंह यांनी दिला होता.
हेही वाचा: शरद पवार पुढाकार घेत नाही, तोपर्यंत देशात पर्यायी सरकार अशक्य, शिवसेना नेत्याचं विधान
ते म्हणाले, आव्हान स्वीकारत आम्ही थेट अयोध्येत जाऊन पोहोचलो आहोत. कोणीही मराठी माणसाला चँलेज करायचे नाही. आम्ही आलोय, आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. ज्यादिवशी राज ठाकरे आदेश देतील तेव्हा या सगळ्यांना जागा दाखवून देऊ, असे अविनाश जाधव यांनी म्हटले. आता यावर अयोध्येतील वातावरण तापणार का हे पहावे लागणार आहे.
Web Title: Mns Leader Avinash Jadhav In Ayodhya Raj Thackeray Visit Cancelled Of Brij Bhushan Singh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..