Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसे नेत्याचं ट्विट; शिवसेनेवर टीका करत म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्र्वादी आणि शिवसेनेवर तुफान फटकेबाजी केली आहे. ते म्हणाले की,
राज ठाकरेंच्या पूर्वीच मनसे नेत्याचं ट्विट; शिवसेनेवर टीका करत म्हणाले...

राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसे नेत्याचं ट्विट; शिवसेनेवर टीका करत म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद इथं होणाऱ्या सभेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सभेआधीच पुणे दौरा, तिथून कार्यकर्त्यांना घेऊन मग औरंगाबादकडे रवाना, पोलिसांच्या सभेविषयीच्या अटीतटी या सगळ्यामुळे सध्या राज ठाकरे चर्चेत आहेत. अशातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलंय.

संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांनी पोलिसांची एक नोटीसही ट्विटरवरून शेअऱ केली आहे. आपल्या ट्विटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात, "रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलयुग आएगा, 'शिव' की 'सेना' कहलाने वाला हनुमान चालिसा से डर जाएगा"

हेही वाचा: राज ठाकरे यांच्या यशासाठी पुण्यात पुरोहित करणार पूजा

राज ठाकरे यांची उद्या म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. अनेक घडामोडींनंतर अखेर या सभेला परवानगी मिळाली आहे. मात्र त्यावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. राज यांच्या सभेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

तर सभेला परवानगी देताना पोलीस आयुक्तांनी सभेसाठी अनेक अटी घातल्या आहेत. त्यामुळे उपस्थितांच्या संख्येवरही मर्यादा आणण्यात आली आहे.

Web Title: Mns Leader Raj Thackeray Aurangabad Rally Sandeep Deshpande Tweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top