Raj Thackeray : "स्वतःची स्टाईल जपायला हवी नाहीतर..."; भाजपाचं नाव घेत रोहित पवारांचा सूचक इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray Rohit Pawar
Raj Thackeray : "स्वतःची स्टाईल जपायला हवी नाहीतर..."; भाजपाचं नाव घेत रोहित पवारांचा सूचक इशारा

Raj Thackeray : "स्वतःची स्टाईल जपायला हवी नाहीतर..."; भाजपाचं नाव घेत रोहित पवारांचा सूचक इशारा

कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरेंनीही आपल्या पत्र लिहिण्याच्या शैलीत हे आवाहन केलं आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना इशारा दिला आहे.

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, "अंधेरीतले महाविकास आघाडीचे आमदार रमेश लटकेंच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहिलं. पण पंढरपूर, नांदेड, कोल्हापूरच्या वेळी पत्र लिहिलं नाही. हा भेदभाव का हे फक्त राज ठाकरेच सांगू शकतात."

हेही वाचा - ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

राज ठाकरेंना सूचक इशारा देत रोहित पवार म्हणाले," मी राज ठाकरेंच्या स्टाईलचा चाहता आहे. पण आता त्यात कुठेतरी बदल होताना दिसतंय. भाजपाचा प्रभाव राज ठाकरेंवर पडतोय. अनेकांना हे भावत नाहीये. त्यामुळे स्वतःची स्टाईल जपायला हवी. भाजपाच्या नादी लागलेले पक्ष असो किंवा व्यक्ती, दोन्हीही संपले आहेत."

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरेंनी पत्र लिहित कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे. हे आवाहन करताना त्यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा दखला दिला आहे. त्यावेळी राज ठाकरेंच्या आवाहनानंतर फडणवीसांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली, असंही राज ठाकरे म्हणाले.

त्या वेळी जो उमदेपणा भाजपाने दाखवला तोच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दाखवावा, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा, असंही राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.