
'गद्दारांना क्षमा नाही' ऐकलं होतं ठाण्यात, मनसेचा शिवसेनेला चिमटा
मुंबई : अनेक आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गोटात सामिल झाल्यानंतर एकाकी पडलेल्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काल मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान वर्षा बंगला सोडला आहे. त्यापूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी मी मुख्यमंत्री नको असेल तर मला समोर येऊन सांगा मी या क्षणाला पद सोडायला तयार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या सर्व घडोमोडींमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसून येत असून, आता यामध्ये मनसेनेदेखील (MNS) उडी घेतली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patill) यांनी ट्वीट करत शिवसेनेवर खोचक टिका केली आहे. (MNS Raju Patil Attack On Shivsena And Uddhav Thackeray)
राजू पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, अशी कशी फुटून गेली वाघाची छाती, कारण द्यायचं 'हिंदुत्व', खरंतर 'ईडी'काडीची भीती. 'गद्दारांना क्षमा नाही' ऐकलं होतं ठाण्यात, ४६ जणांचा कोरस गातोय सत्तेसाठीच्या गाण्यात असं यमक जुळवत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तर त्या पूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा विधानाचीदेखील खिल्ली उडवली आहे.
काल फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्यांना माझा राजीनामा हवा आहे त्यांनी मला थेट येऊन सांगवं त्याचक्षणी मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल असे म्हटले होते. यावर टीका करताना राजू पाटलांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी माझा त्रिफळा उडाला आहे.. पण अम्पायरने मला भेटून, कानात सांगावे की मी आऊट आहे.. तरच मी बॅट सोडेन..अशा खोचक शब्दांत चिमटा काढला आहे.
Web Title: Mns Leader Raju Patil Tweet On Maharashtra Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..