''राज बाबू...'' अग्रलेख सामनातून का हटवला? मनसेचा राऊतांना सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Leader Sandeep Deshpande on Sanjay Raut

''राज बाबू...'' अग्रलेख सामनातून का हटवला? मनसेचा राऊतांना सवाल

मुंबई : राज्यात कोरोनाच्या काळात वाईन शॉप सुरू करावे, अशा सूचना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) दिल्या. तेव्हा संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून राज ठाकरे यांच्या सूचनेची खिल्ली उडवली होती. आता राज्य सरकारने वाईन सुपर मार्केटमध्ये विकण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर तो अग्रलेख सामनाच्या वेबसाईटवरून का हटवण्यात आला? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी विचारला आहे.

हेही वाचा: राऊत कुटुंबाचा वाईन उद्योजकांशी करार; सोमय्यांनी दाखवली कागदपत्रे

राज्य सरकारने नुकताच राज्याचा महसूल वाढवण्यासाठी वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयावर मनसेने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे का? तेव्हा राज ठाकरेंवर टीका करणारा अग्रलेख सामनाच्या वेबसाईटवरून का हटवण्यात आला? कंपन्यांचे शेअर विकत घेतले म्हणून सुबुद्धी सूचली का? असे सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले.

नेमका काय होता अग्रलेख -

राज्यात कोरोना वाढत होता. त्यावेळी लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे राज्याचा महसुलात मोठी घट होत होती. त्यावेळी वाईन शॉप सुरू करावेत अशा सूचना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिल्या होत्या. पण, संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या सूचनेची खिल्ली उडवत सामना अग्रलेखातून त्यांच्या टीका केली होती. ''फाईन, डाईन, वाईन...वाह राज बाबू'' असा तो अग्रलेख होता. पण, आता राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर हा अग्रलेख सामना वेबसाईटवरून हटवण्यात आला. त्यामुळे मनसेकडून संजय राऊतांवर टीका केली जात आहे.

''भाजपचे पाप...''-

शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि वायनरीजला चालना मिळावी म्हणून सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी देण्यात आली, असं राज्य सरकारने सांगितलं. पण, त्यानंतर भाजपकडून राज्य सरकावर जोरदार टीका करण्यात आली. राज्य सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पण, भाजपचे सरकार असलेल्या राज्यात मद्य सुरू असल्याचं महाविकास आघाडीमधील नेतेमंडळी सांगतात. त्यावरून देखील संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. भाजपचे पाप मोजून शिवसेनेचे पाप कमी होणार नाहीत, असा टोला देशपांडेंनी लगावला आहे.

Web Title: Mns Leader Sandeep Deshpande Asked Sanjay Raut Why Removed Samana Editorial On Raj Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top