Maharashtra Politics : २७ नोव्हेंबर सबका हिसाब होगा! मनसेच्या गोटात शिजतंय काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray
Maharashtra Politics : २७ नोव्हेंबर सबका हिसाब होगा! मनसेच्या गोटात शिजतंय काय?

Maharashtra Politics : २७ नोव्हेंबर सबका हिसाब होगा! मनसेच्या गोटात शिजतंय काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झाली आहे. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यापासून मनसे नेते आक्रमक भूमिकेमध्ये दिसून आले आहेत. असं असतानाच आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी एक सूचक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी एक तारीख सांगत चर्चांना जन्म दिला आहे.

२७ नोव्हेंबर सबका हिसाब होगा, असं ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. त्यामुळे आता त्यादिवशी काय होणार याची चर्चा आहे. कारण त्याबद्दल अद्याप संदीप देशपांडे किंवा इतर कोणत्याही मनसे नेत्याने कोणतीही कल्पना दिलेली नाही. दरम्यान, सावरकरांविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसे नेते चांगलेच संतप्त झाले होते.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

राहुल गांधींची शेगावमधली सभा उधळून लावण्याचा इशाराही मनसेने दिला होता. त्यासाठी ते सभास्थळी रवाना झाले होते. मात्र त्यांना मधेच पोलिसांनी आडवलं. तिथे त्यांनी ठिय्या आंदोलनही केलं. शिवाय आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मनसे वारंवार बैठकाा घेताना दिसत आहे. शिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभरात विविध ठिकाणी दौऱ्यावरही जात आहेत. त्यामुळे आता २७ नोव्हेंबरला नक्की होणार काय? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल.