Loksabha 2019 : 'थप्पड से नही राजसाहब के व्हिडिओसे डर लगता है'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

राज ठाकरे यांनी यापूर्वी मुंबईतील गुढी पाडवा मेळाव्यात व्हिडिओतून मोदींची तेव्हाची आणि आताची भाषणे दाखविली होती. तशाच सभा राज यांच्याकडून महाराष्ट्रभर घेण्यात येत आहेत.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीविरोधात प्रचारसभांचा धडाका सुरु केला असून, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपची अवस्था म्हणजे 'साहब मनसे के थप्पड से नाही लेकिन राजसाहब के व्हिडिओसे डर लागता है, असे ट्विट केले आहे.

राज ठाकरे यांनी सोमवारी रात्री सोलापुरात सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी युती सरकारच्या मी लाभार्थी या जाहिरातीतील बेरोजगाराला समोर आणून पोलखोल केली. यावेळी त्यांनी भाजपला मदत करणाऱ्यांना मतदान करू नका, असेही आवाहन केले. राज यांच्या या सभेनंतर आघाडीला याचा फायदा होणार हे नक्की मानले जात आहे. 

राज ठाकरे यांनी यापूर्वी मुंबईतील गुढी पाडवा मेळाव्यात व्हिडिओतून मोदींची तेव्हाची आणि आताची भाषणे दाखविली होती. तशाच सभा राज यांच्याकडून महाराष्ट्रभर घेण्यात येत आहेत. भाजपकडून यांच्याकडून राज यांच्या सभांवर टीका होत असताना संदीप देशपांडे यांनी ट्विट करत भाजपला आता राज ठाकरेंकडून दाखविण्यात येत असलेल्या व्हिडिओची भिती वाटत असल्याचे म्हटले आहे.

Web Title: MNS leader Sandip Deshpande attacks BJP on Raj Thackerays rallies