Loksabha 2019 : 'भाजपला आता नवा धक्का? उत्सुकता आणि प्रतीक्षा' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 एप्रिल 2019

राज ठाकरे यांची आज दुसऱ्या टप्प्यातील पहिली सभा होत आहे. अजूनही हरिसालच्या धक्क्यातून न सवरलेल्या भाजपला नवा धक्का???? उत्सुकता आणि प्रतीक्षा.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांना आजपासून (मंगळवार) सुरवात होत असताना, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता भाजपला नवा धक्का देणार असे ट्विट केले आहे.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. त्यांनी नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे आणि महाड येथे प्रचारसभा घेतल्या. या सभांतून त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला होता. तसेच व्हिडिओच्या माध्यमातून मोदी सरकारची पोलखोल केली होती. हरिसाल या डिजीटल गावातील परिस्थिती त्यांनी दाखविली होती. त्यावर चर्चा सुरु असतानाच आता देशपांडे यांनी ट्विट केले आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की राज ठाकरे यांची आज दुसऱ्या टप्प्यातील पहिली सभा होत आहे. अजूनही हरिसालच्या धक्क्यातून न सवरलेल्या भाजपला नवा धक्का???? उत्सुकता आणि प्रतीक्षा.

Web Title: MNS leader Sandip Deshpande talked about Raj Thackeray rally and BJP