MNS president Raj Thackeray found corona Positive the surgery on him was postponed
MNS president Raj Thackeray found corona Positive the surgery on him was postponed

राज ठाकरेंना कोरोनाची लागण, पुढे ढकलली शस्त्रक्रिया

Published on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना डेड सेलमुळे त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. पायाच्या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात आज दाखल करण्यात आले होते. दरम्यान या शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. (MNS president Raj Thackeray found corona Positive the surgery on him was postponed)

राज ठाकरे यांना मागच्या काही दिवसात ठाणे, औरंगबाद आणि पुणे येथे सभा घेतल्या होत्या, पुण्यातील सभेत त्यांनी त्यांच्या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आज ते लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेपूर्वीच्या तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. या आधी देखील राज ठाकरे यांना कोरोना झाला होता. दरम्यान कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे.

MNS president Raj Thackeray found corona Positive the surgery on him was postponed
बैलगाडा शर्यतीबाबत नितेश राणेंची मोठी घोषणा; म्हणाले, फडणवीस...

मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू होती, मात्र उत्तर प्रदेशच्या भाजप खासदाराने विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा स्थगीत केला होता. तसेच यानंतर राज ठाकरे यांना मनसे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा तो एक सापळा होता असे सांगितले होते. तसेच पुण्यातील सभेत बोलताना त्यांनी त्यांच्या प्रकृतीसंबंधी देखील माहिती दिली होती. तसेच राज्यातील जनतेसाठी एक पत्रक देणार असल्याचे देखील सांगितले होते.

MNS president Raj Thackeray found corona Positive the surgery on him was postponed
अहमदनगर : जवखेडे खालसा खटल्यातून तीनही आरोपी निर्दोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com