MNS : "साहेबांना विचारलं का?"; मनसेचं ट्वीट अन् नेटकऱ्यांना आठवली शिंदे-फडणवीसांची शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amey Khopkar
MNS : "साहेबांना विचारलं का?"; मनसेचं ट्वीट अन् नेटकऱ्यांना आठवली शिंदे-फडणवीसांची शपथ

MNS : "साहेबांना विचारलं का?"; मनसेचं ट्वीट अन् नेटकऱ्यांना आठवली शिंदे-फडणवीसांची शपथ

मनसे आणि भोंगे हा विषय महाराष्ट्राला आता नवीन राहिलेला नाही. याआधीही मनसेने हा मुद्दा उचलून धरत याविरोधात आंदोलन केलं होतं. पण आता दिवाळी आणि फटाक्यांच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा वर आला आहे. मात्र नेटकऱ्यांनी मनसेला आता चांगलंच धारेवर धरलं आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिवाळीच्या निमित्ताने आणि फटाक्यांच्या संदर्भाने एक ट्वीट केलं होतं. आपल्या ट्वीटमध्ये खोपकर म्हणतात, "ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही.आमचा सण आहे,आम्ही फटाके वाजवणारच.आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा."

या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी मात्र खोपकरांना चांगलंच धारेवर धरलं आहे. नेटकऱ्यांना यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आठवण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला फटाके न वाजवण्याची आणि प्रदूषण न करण्याची शपथ घेतली होती. अमेय खोपकरांचं हे ट्वीट वाचताच नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा: CM Eknath Shinde : 'चलो अयोध्या'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामलल्लाच्या दर्शनाला जाणार

काही जणांनी त्यांना फडणवीस शिंदेंनी घेतलेल्या शपथेची आठवण करून दिली आहे. तर काहींनी राज ठाकरे आणि शिंदे फडणवीसांच्या संबंधांवर भाष्य केलं आहे. अनेकांनी त्यांना "तुमच्या साहेबांना विचारुन ट्वीट केलं आहे का?" असा प्रश्नही विचारला आहे.