
"महाराष्ट्राचे भाग्यविधाते राज ठाकरेंच्या चुलत बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा"
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शुभेच्छांनंतर आता उद्धव ठाकरेंना मनसेने दिलेल्या शुभेच्छांची चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा: ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख का म्हटलं नाही? CM शिंदेंनी उत्तर देणं टाळलं
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या अमेय खोपकरांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं हे ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये अमेय खोपकर म्हणतात, "हिंदू जननायक अखंड महाराष्ट्राचे भाग्यविधाते आदरणीय राज साहेब ठाकरे यांचे चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"
हेही वाचा: 'शिवसेना पक्षप्रमुख' उल्लेख टाळत CM शिंदेंनी ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकाळीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छा देताना त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख राज्याचे माजी मुख्यमंत्री असा केला. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला नाही. तर शिंदे गटातले श्रीकांत शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी मात्र उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणतच शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिंदेंच्या गटातही फूट पडलीये की शिंदे गटातल्या काही नेत्यांसाठी अजूनही उद्धव ठाकरेच शिवसेना पक्षप्रमुख आहे, असे प्रश्न उपस्थित होतायत.
Web Title: Mns Raj Thackeray Ameya Khopkar Uddhav Thackeray Birthday Shivsena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..