शेवटचा एक दिवस बाकी... भोंगे बंद झालेच पाहिजे; मनसेचा रिमाइंडर | Loudspeaker Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Ultimatum | Loudspeaker Controversy

"शेवटचा एक दिवस बाकी... भोंगे बंद झालेच पाहिजे"; मनसेचा रिमाइंडर

मुंबई : सध्या देशभरात भोंग्याच्या प्रश्नावरुन वाद सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबादेतील जाहीर सभेत मशिदीवरील भोंग्याबाबत वक्तव्य करुन ३ तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर आता मनसे प्रवक्ते यांनी शेवटचा एक दिवस बाकी म्हणत ट्वीट केलं आहे.

राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये दोन दिवसांपूर्वी सभा घेतली त्यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवा नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा जाहीर इशारा दिला होता. ईदचा सण झाल्यावर आम्हाला मशिदीवरील भोंगे खाली उतरवलेले दिसले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता 'फक्त एक दिवस बाकी आहे' असं ट्वीट नवी मुंबईचे मनसे अध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी केलं आहे. भोंगे बंद झालेच पाहिजे नाहीतर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार असं ट्वीट करत त्यांनी इशारा दिला आहे. (Loudspeaker Controversy)

हेही वाचा: मोदींनी दिलं जर्मनीच्या चान्सलरला अनोखं भारतीय बनावटीचं गिफ्ट

भोंग्याचा प्रश्न हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे असं सांगत सर्वांनी भोंगे खाली उतरवण्याचा इशारा राज ठाकरे यांनी सभेत दिला होता. त्यानंतर राज्यभर तणाव पसरला असून राज्यातील गृहखात्याने कारवाई सुरु केली आहे. बऱ्याच ठिकाणी मनसैनिकावर कारवाई केली असून राज ठाकरे यांनी सभेसाठी घातल्या गेलेल्या अटी मोडल्या आहेत असा आरोप अनेकांनी केला आहे. त्यानंतर पोलिस राज ठाकरे यांचं भाषण ऐकून त्यामध्ये काही आक्षेपार्ह आहे का याची तपासणी करत आहेत. त्यानंतर त्यांनी अटी मोडल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगिचतलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी ईदनंतर भोंगे खाली उतरवण्याचा इशारा दिला असून आज ईद असल्याने मनसेने आयोजित केलेला महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता ईद झाल्यावर भोंगे खाली उतरले पाहिजेत नाहीतर हनुमान चालीसा वाजणार असा इशारा प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे. ईद झाल्यावर महाराष्ट्राचे चित्र काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: Mns Raj Thackeray Loudspeaker Reminder One Day Eid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top