
Raj Thackeray: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज ठाकरे म्हणतात, "लोकशाही संस्थांची स्वायत्तता..."
Raj Thackeray News: निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वागत केलं आहे. तसंच लोकशाही संस्थांची स्वायत्तता टिकवण्यासाठी असे निर्णय महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रियाही राज ठाकरेंनी दिली आहे.
निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नवा कायदा होईपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करते. लोकशाही संस्थांची स्वायत्तता टिकायलाच हवी !
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?
पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि CJI यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.सध्या केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणुका करत होते.