सेवक छत्रपतींची सेवा करण्यास निघाला; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली | Babasaheb Purandare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले.

राज ठाकरे मुंबईहून पुण्यात येऊन बाबासाहेबांचे निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली.

सेवक छत्रपतींची सेवा करण्यास निघाला; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी राज ठाकरे यांचे घनिष्ठ असे संबंध होते. राज ठाकरे हे नेहमीच बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेण्यासाठी जात असत. जन्मशताब्दीच्या कार्यक्रममातही राज ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरे मुंबईहून पुण्यात येऊन बाबासाहेबांचे निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली.

राज ठाकरे यांनी ट्विटरवरूनही श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलं की, बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते.

हेही वाचा: 'असा माणूस शतकांमधून एकदाच होतो'; मृणाल कुलकर्णी भावूक

बाबासाहेब मला नेहमी सांगत, "महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची!" शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला अशा भावना राज ठाकरे यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top