'सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली'; मनसेचा सेनेला टोला

Uddhav Thackeray Raju Patil
Uddhav Thackeray Raju PatilSakal

मुंबई : संभाजी ब्रिगेड या संघटनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं असून उद्धव ठाकरेंकडून सेना उभारणीसाठी पुन्हा प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान मनसेच्या राजू पाटील यांनी सेनेला चिमटा काढला आहे.

(MNS vs Shivsena)

"सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली." असं मनसेच्या राजू पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे. त्यानंतर त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत युती केल्यामुळे अनेक स्तरावरून सेनेवर टीकाही झाल्या आहेत. दरम्यान या संघटनेच्या आक्रमकतेमुळे शिवसेनेने युती का केली असा सवालही अनेकांनी केला आहे.

Uddhav Thackeray Raju Patil
पोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा स्वित्झर्लंड न्यायालयात मोठा विजय

दरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संभाजी ब्रिगेडसोबत युती करत असल्याचं अधिकृतरित्या स्पष्ट केलं आहे. "आम्ही दोन्ही शिवसैनिक आहोत, आजवरचा जो इतिहास आहे तो मराठी माणसांचा म्हणा किंवा मराठ्यांचा म्हणा. आपण एकत्र येऊन एक नवा इतिहास घडवू, दुहीच्या शापालाच गाढून टाकू. आमची भूमिका रोखठोक आहे म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत." असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते.

Uddhav Thackeray Raju Patil
Prakash Amte : अडीच महिन्यांच्या उपचारानंतर प्रकाश आमटे अखेर पोहोचले घरी

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकार लयास आलं आहे. तर शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन नवं सरकार स्थापन केलंय. त्यानंतर शिवसेना परत राजकारणात आपले पाय रोवण्यासाठी प्रयत्न करत असून शिवसंवाद यात्रा, महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर आज संभाजी ब्रिगेड या संघटनेशी युती करण्याची घोषणा केल्यामुळे अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Uddhav Thackeray Raju Patil
Congress: गुलाम नबी आझादनंतर काँग्रेसच्या आणखी पाच बड्या नेत्यांचा राजीनामा
Uddhav Thackeray Raju Patil
शिंदे सरकारची मोठी घोषणा! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com