esakal | ‘डेटा’गिरी’मध्ये महाराष्ट्र नंबर वन..!
sakal

बोलून बातमी शोधा

Trai

टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) भारतातील वायरलेस डेटा सर्व्हिसवर नुकताच अहवाल सादर केला. देशभरात मोबाईल डेटा वापरात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यातील सात कोटी ३० लाख ७० हजार ग्राहकांनी गेल्या वर्षभरात ६७४ कोटी २८ लाख ९९ हजार ६०० जीबी इतका डेटा वापरला.

‘डेटा’गिरी’मध्ये महाराष्ट्र नंबर वन..!

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक - टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) भारतातील वायरलेस डेटा सर्व्हिसवर नुकताच अहवाल सादर केला. देशभरात मोबाईल डेटा वापरात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यातील सात कोटी ३० लाख ७० हजार ग्राहकांनी गेल्या वर्षभरात ६७४ कोटी २८ लाख ९९ हजार ६०० जीबी इतका डेटा वापरला.

महाराष्ट्राखालोखाल डेटा वापरात उत्तर प्रदेशचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात २०१७ च्या तुलनेत एक कोटी ७८ लाख ८० हजार डेटा वापरकर्त्यांची संख्या वाढली. २०१८ मध्ये देशात सक्रिय मोबाईल वापरकर्त्यांची संख्या ११७ कोटी ६० लाख इतकी होती. त्यापैकी ५७ कोटी ८२ लाख ग्राहकांकडून वायरलेस डेटा वापरला गेला. अर्थात, सक्रिय मोबाईल क्रमांकांपैकी निम्म्या मोबाईल क्रमांकांवरच वायरलेस डेटा म्हणजेच इंटरनेटचा वापर केला गेला.

ठळक बाबी (२०१८)
५७ कोटी ८२ लाख डेटा वापरणाऱ्यांची संख्या 

४,६४०.४० कोटी जीबी वर्षभरात वापरलेला डेटा

५४,६७१.३३ कोटी डेटा विक्रीतून कंपन्यांना मिळालेला महसूल

७.६९ जीबी एका ग्राहकाचा प्रतिमहिना वापर

loading image
go to top