esakal | मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीसाठी राज्याला केंद्राकडून 650 कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीसाठी राज्याला केंद्राकडून 650 कोटी

राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी केंद्राचा वाटा म्हणून साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी देण्यास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीसाठी राज्याला केंद्राकडून 650 कोटी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी केंद्राचा वाटा म्हणून साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी देण्यास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, अशी माहिती राज्याचे समाजकल्याणमंत्री सुरेश खाडे यांनी दिली. यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राकडे तातडीने पाठवेल, असेही त्यांनी सांगितले. 

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री अविनाश महातेकर व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्याला केंद्राकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या निधीबाबत चर्चा झाली. याबाबत राज्याची मागणी मान्य करत वर्ष 2019-20 साठी केंद्र आणि राज्य शासनाच्या 60:40 प्रमाणातील वाट्यानुसार केंद्राकडून 650 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. 

दलित अत्याचार प्रतिबंधक (ऍट्रॉसिटी) कायद्यांतर्गत आंतरजातीय विवाह व अत्याचार प्रतिबंधासाठी केंद्राने द्यायचा उर्वरित 30 कोटींचा निधी येत्या आठवडाभरात राज्याला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.

loading image
go to top