Mohit Kamboj Clarification : बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या दिवशी त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी शेवटं बोलणे झाले होतं. तसेच बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहिलं होतं, अशी माहिती बाबा सिद्दीकींचे सुपूत्र झिशान सिद्दीकी यांनी पोलीस तपासात दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना मोहित कंबोज यांनीही यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.