Mpoxesakal
महाराष्ट्र बातम्या
Mpox: सावधान! मुंबईवर मंकीपॉक्सचं सावट; आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी, जाणून घ्या लक्षणं
monkeypox: सध्या आफ्रिकन देशांमध्ये मांकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आता या आजाराने पाकिस्तानातही थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (ता. १९) उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यांना पावले उचलण्याचे निर्देश दिले, मात्र यादरम्यान देशात एकही रुग्ण आढळला नसल्यामुळे जनतेने अजिबात घाबरून जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले.
मुंबई: मंकीपॉक्स जगामध्ये झपाट्याने पसरत आहे. ही महामारी आता आफ्रिकेतून पाकिस्तानात पोहोचली आहे. दुसरीकडे, याचा मुंबई आणि पुण्यावर सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण, या दोन शहरांमध्ये परदेशातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
यामध्ये बहुतांश आफ्रिकन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अशा स्थितीत राज्याच्या आरोग्य विभागाने या आजाराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याशिवाय राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.