esakal | मॉन्सून परतणार; राज्यात पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

मॉन्सून परतणार; राज्यात पावसाची शक्यता

मॉन्सून परतणार; राज्यात पावसाची शक्यता

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पुणे : विदर्भासह कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी शुक्रवारपर्यंत (ता. ९) पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पोषक वातावरणाच्या अभावामुळे राज्यात मॉन्सूनची वाटचाल गेल्या काही दिवसांपासून मंदावली आहे. सोमवारी (ता. ५) मात्र कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडला.

दरम्यान, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी बुधवारपासून (ता. ७)पोषक वातावरण तयार होणार आहे. बंगालच्या उपसागारावरुन बाष्पयुक्त वारे पुढील तीन दिवसांत देशाच्या वायव्य भागात प्रवेश करतील. परिणामी मॉन्सूनचा प्रवास हा दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि पश्‍चिम उत्तर प्रदेशाच्या काही भागात १० जुलैपर्यंत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा: नारायण राणेंना दिल्लीवरुन आमंत्रण

पुण्यात पावसाची हजेरी

पुणे शहर परिसरात सोमवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. शहरात १०, तर लोहगाव येथे ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील आठवडाभर शहरात आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महत्वाचे मुद्दे...

- बंगालच्या उपसागरात ११ जूलै दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता

- बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे ८ जुलैपासून ईशान्य भारतात प्रवेश करतील

- तसेच १० जूलै नंतर हे वारे उत्तर पश्‍चिम भारतात पंजाब आणि उत्तर हरियानात प्रवेश करतील

- यामुळे १० जूलै पासून उत्तर पश्‍चिम आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार

195 words

loading image